गर्भसंस्कार

Back

गर्भसंस्कार विभाग

हल्लीच्या थकाथकीच्या व्यवस्त जीवनशैलीत अपत्य संगोपन, शिशु संगोपन,सुश्रुषाव संस्कार या सर्वच पैलूंचा विचार करता वेळेच नियोजन कसे करावे ? हा प्रश्न पालकान व संतती इच्छुक दाम्पत्यांना भेडसावत असतो अशा अनेक अनेकप्रश्नांची उत्तरे सहज हस्तगत व्हावित या प्रांजळ हेतूने गर्भसंस्कार हा विभाग दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ मार्गाच्या वतीने काम करतो.

आमचे उद्देश

नव्या पिढीवर संकर रुजलेले असावेत यासाठी प्रथम आईच्या उदरात गर्भावरच संस्कार केले तरच भविष्यात आदर्श मानव घडविणे सहज सोपे होईल, याद्वारे सुयोग्य, सशक्त,बुद्धिमान, नीतिमान पिढी निर्माण होऊन राष्ट्रोन्नतीसाठी हीच पिढी सक्रीय ठरणार आहे हाच विश्वास मनी बाळगून या विभागाची निर्मिती कण्यात आलेली आहे.

सेवा आणि मार्गदर्शन

. गर्भवती माताभगिंनीना प्रसुतीपुर्व गर्भसंस्कार विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन
. गर्भारपणे नऊ महिन्यात करायच्या आध्यत्मिक सेवा व संस्कार मार्गदर्शन
. बालकाच्या जन्मानंतर बालकाचे संगोपन मार्गदर्शन
. तज्ञ डॉक्टरांकडून प्रात्यक्षिक व मार्गदर्शन

संपर्क

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक

०२५९९४-२३४००७

७७२००१००७४