कुलदेवतेचा मानसन्मान
कुलदेवतेच्या मुळ स्थानावर जाणे. कुलदेवतेला सप्तशती ग्रंथात दिल्याप्रमाणे ११ अलंकार वाहुन पूजा व मानसन्मान करणे.
हा मानसन्मान लगेच शक्य नसेल तर, देव्हाऱ्यात कुलदेवतेच्या नावाने भागबांधणी करणे. (नवीन शुभ्र वस्रात १ सुपारी ,११ रुपये, हळद , कुंकू व अक्षता हातात घेऊन “विवाह सुयोग्य ठिकाणी वा निर्विघ्नपणे पार पडू दे अशी पार्थना करणे, प्रार्थना झाल्यावर भाग बांधणी देव्हाऱ्यात बांधून ठेवणे, विवाह झाल्यावर ६ महिन्याच्या आत कुलदेवतेचा मानसन्मान करणे.)
भाग बांधणीस रोज हळदी कुंकू वाहुन विवाहविषयक विनंती करावी. भाग बांधणी केल्यावर कोणत्याही देवीच्या देवळात जाऊन दर्शन घेऊ देऊ नये. बाहेरून दर्शन घेतले तर चालेल व विवाह झाल्यावर कुलदेवतेच्या स्थानावर भागबांधणीसह कुलदेवतेचा मानसन्मान करणे.
उसाचा तोडगा
मंगळवारी मुळासकट अखंड व त्याच्या शेंड्याला ५ पाने आहेत असा उस विनंतीपूर्वक घेऊन यावा,
तो स्वच्छ धुऊन घरामध्ये पूर्वेकडील भिंतीला टेकून व पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्वेकडे येईल अशाप्रकारे पाटावर ठेवावा सकाळी
११ च्या आत त्याची पंचोपचार पूजा यज्ञविधीनुसार करावी व त्यानंतर हातात १ जोडी जानवे घेऊन एक वेळ पुरुष सुक्त म्हणावे व
ते जानवे उसाच्या एका पानात अडकवावे मंगळवारी दोन्ही वेळेस उपवास करणे जरुरीचे आहे.
पूजा झाल्यावर नमस्कार करून विवाह लवकर होण्यासाठी प्रार्थना करावी व पूजेसाठी हातात पाणी घेऊन संकल्प करावा.
हा तोडगा वधु व वर या दोघानांही करता येतो.