वरासाठी उखाणे
- १) स्वामींच्या दरबारात लावल्या तुळशी ,
.... चे नाव घेतो सत्यनारायणाच्या दिवशी. - २) महाराजांना मुजरा करतो वाकून,
.... चे नाव घेतो तुमच्या सर्वांचा मान राखून. - ३) गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी करावे गुरुचरित्राचे पारायण,
.... चे नाव घेतो, आशीर्वाद देवो सत्यनारायण. - ४) स्वामींच्या दरबारात होते त्रिकाळ आरती, मी,
.... चा पती आणि ती माझी सौभाग्यवती. - ५) स्कारापैकी महत्वाचा आसोळा संहे “विवाह संस्कार”,
....सोबत विनाहुंडा विवाह करून करतो गुरुमाऊलींचे स्वप्न साकार. - ६) पर्यावरण प्रकृती विभागांतर्गत केले वृक्षारोपण,
.... सोबतीने आता संसारात करतो मार्गक्रमण. - ७) अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा,
.....ला घास भरवितोवर्ण भात तुपाचा. - ८) टाळ चिपळ्यांचा गजर त्यामध्ये वाजे वीणा,
..... नव घेतो सर्वजय हिंद म्हणा. - ९) पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले,
....चं नव घेतल्यावर चेहरा माझा खुले.. - १०) जिजाऊ सारखी माता, शोवजी सारखा पुत्र,
.... च्या गळ्यात बांधतो मंगळसूत्र. - ११) सोन्याचा दिवा, कापसाची वात, आयुष्याभर देईन,
....ची साथ. - १२) आंब्याच्या झाडावर बसून कोकिळाकरी कूजन,
माझ्या नावाचे....करी पूजन. - १३) मातीच्या चुली घालतात घरोघर,
....झालीस माझी आता चाल बरोबर. - १४) ओझरच्या गणपतीच्या गोपूर बांधणारे होते कुशल,
....चे नव घेतो तुमच्या साठी स्पेशल. - १५) लग्नात घालतात हार आणि तुरे,
....च्या नाव घेतो आता आग्रह पुरे.
वधूसाठी उखाणे
- १) रामाच्या देवळाला सोन्याचा घाट,
------च्या जीवावर -------चा थाट. - २) नाशिकच्या गंगेवर चिरेबंदि घाट,
----- च्या पंक्तीस ------ चा पाट. - ३) अलीकडे गंगा, पलीकडे गंगा, मध्ये टाकला दोर,
----- राव थोर त्यांच्या हाती खेळे मोर. - ४) दारी होते कोनाडे त्यांत होती सळी,
------ ची बायको गुलाबाची कळी. - ५) किनखापाची गादी त्याला भरगच्ची लोड,
------ चे बोलणे अमृतापेक्षा गोड. - ६) हरिद्वाराहुन आला बाबा,त्याची दोन हात लांब दाढी,
--- नेसायला आणली मला भरगच्च साडी. - ७) काळी गळेसरी गळाभर आणि,
----ना पाहिन डोळाभर. - ८) आईने वाढवलं,वडिलांनी पढवलं,
-----रावांनी त्यांची होताच सोन्याच मढवलं. - ९) दारी होता खांब त्याला आला घाम,उठा उठा,
---- शेला करा लांब. - १०) मुगाच्या डाळीच्या खीचडीवर तुपाची धार,
----रावांचे नाव घेते----बाई नार. - ११) वाद्यांमध्ये सुरेख वाद्य म्हणजे बीन,
----रावांच्या चरणी ----बाई लीन. - १२) सौभाग्यवतीचा अलंकार म्हणजे कांचेचे चुडे,
----- रावांचे नाव घेते मंगळागौरी पुढे. - १३) संगमरवरी देवळांत बसवली रामाची मुर्ती,
------ रावांशी लग्न झाले झाली इच्छापुर्ती. - १४) भोसल्यांची सुन जिजाबाई धन्या,
----- रावांचे नाव घेते---- पंतांची कन्या. - १५) कुपण नको, कार्ड नको, नको कापड कोटा,
------ रावांच्या घरी नाही कशाचा तोटा. - १६) ऋष्यश्रृंगाची पत्नी दशरथकन्या शांता,
-----रावांचे नाव घेते----- बाई कांता. - १७) शिवासारखा पिता अन् गिरीजेसारखी माता,
----- रावांसारखा पती मिळुन स्वर्ग आला हाता. - १८) चंद्राचा झाला उदय आणि समुद्राला आली भरती,
----- रावांच्या नावाने सगळे श्रम हरती. - १९) शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान,
------ रावांचे नाव घेते,राखते सर्वांचा मान. - २०) द्राक्षाच्या वेलीला त्रिदळी पान,
----- पंतांचे नाव घेते,राखते सर्वांचा मान. - २१) ---- रावांची कन्या,झाले ---- पंतांची सुन,
-----रावांच्या राज्यात नाही कशाचे न्युन. - २२) चांदीच्या तबकात ठेवले नवसाचे पेढे,
------ रावांच्या दर्शनाने मन झाले वेडे. - २३) अत्तरदाणी गुलाबदाणी विडे ठेवले करून,
----- रावांना माळ घातली कुलस्वामीनी स्मरून. - २४) करवतकांठी धोतर,पांघरले गुलाबी शाल,
---- शास्त्रींच्या प्रवचनासाठी श्रोत्यांनी भरला हॉल. - २५) इलेक्टीकच्या दिव्याला एनॅमलची शेड,
----रावांचे नाव घेते----- ची चेड. - २६) कुरूंदाची सहान,चंदणाचे खोड,
---- रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड. - २७) चंद्राचा झाला उदय,सागराला आली भरती,
---- पंतांच्या हृदयात--- रावांची मुर्ती. - २८) शिवाजीसारखा पुत्र जिजाईसारखी माता,
-----रावांचे नाव घेते सर्वांच्या करीता. - २९) महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू,
---- चे नाव घेऊन हिंदमातेचा जयघोष करू. - ३०) कॅप्टन लक्ष्मी,नेताजी सुभाषचंद्रबोस,
---- नाव घेऊन जयहिंदचा घोष करू.